काही परस्परांशी अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र येऊन एक विशिष्ट Enjoyable Situation तयार होते तेंव्हा त्याला भट्टी जमणं असं म्हणतात.
असं अनेकदा होतं तरीही ते होणं तसं दुर्मिळच. आज असंच काहीसं झालं. नेहमीचा Mode of Transport सोडून मी बेस्ट च्या बस ने घरी येत होतो. गर्दी तशी कमी होती. (म्हणजे सुटं सुटं उभं राहता येत होतं). आवडीप्रमाणे मी थेट पुढच्या टोकाला जाऊन चालकाच्या मागच्या जाळीला धरून; तिला चेहरा टेकवून; जेणे करून तो कसा गियर टाकतो, कसं जजमेंट घेतो हे न्याहाळता यावं; उभा राहिलो.
जेंव्हा जेंव्हा बसने एकटा जातो तेंव्हा नेहमीच; संधी मिळाली की मी ही जागा पकडतो. १० मिनिटं झाली तोच आणखी आवडीची जागा रिकामी झाली. पुढच्या दाराजवळ असते ती सिंगल सीट. अपंगांसाठी राखीव असते, पण तेंव्हा कुणीच नव्हतं बसलेलं. शिवाय, लेडीज सीट वर म्हातारे आजोबा बसलेले असतानाही तुसडेपणाने बोलून त्यांना उठवणा-या ‘लेडीज’ बघितल्यात मी; त्यामूळे कुणी स्वत:हून म्हटलं तरी मी ‘त्या’ सीट्स च्या वा-याला जात नाही. पण अपंगांच्या सीट वर बसताना तसा विचार आला नाही; आणि अपंग काय किंवा आणखी कुणी काय, गरजू व्यक्तीला तिने म्हणायच्या आधी सीट मोकळी करून देण्याचं सौजन्य कधीच विसरत नाही मी.
तर त्या सिंगल सीट वर बसलो. कानात गाणी चालूच होती. आता भट्टी अशी जमली की;
एक तर बेस्ट बसचा प्रवास,
दुसरं म्हणजे त्या बसचा बेफाम ड्रायव्हर,
तिसरं म्हणजे ही EXCLUSIVE सिंगल सीट,
आणि कानात एनिग्मा चं - सॅडनेस हे गाणं. त्यांचा तो सिग्नेचर बीट. .. ..
सगळ्याची एकत्रित कल्पना करून बघा जमलं तर !
माहोल जमला चायला एकदम ! रिपीट वर टाकलं गाणं. लास्ट स्टॉप कधी आला कळलंच नाही.

रॉकमधली काय फारशी अक्कल नाय मला पण अशीच शिच्वेशन घडली. यस्टी बशीतून बोरीवली ठाणे येत होतो. थंडीचे दिवस होते. रात्री उशीराचा सुमार होता. बसमधली पाच सहा डोकी ठार झोपली होती. एकमेव पिवळा दिवा भगभगत होता. नवीन नॉईज क्यान्सलिंग हेडफोन्स, खिडकीतून गार वारा, बाहेर मिट्ट काळोख, मोबाईलवर साक्षात् वसंतरावांचं सावरे ऐजैयो आणि कहर म्हणजे साथीला झाकिर हुसेन!
ReplyDeleteमाहोल काय तो जमलाच की एकदम!!
:)
Khalaaas ! Ye hui na baat...
Deleteदोन्ही पोस्त आवडले ! माहोल बनवणं आपल्या हातात असत !
Deletenice one.. i can imagine..
ReplyDeleteThanks!!
Deletemast! original post and alhadmahabal che post donhi sangtaat भट्टी जमणं mhanje kaay :-)
ReplyDeletepan te Enigma che Sadness gaane mhanje sagle Latin ki ho ... kaahihi kalale naahi, pan sangeet kaanala laabhle.
:) Yes. Well music doesnt have a language as they say. Enigma chya tunes, beats ek maahol jamavtat.
Deleteani ho... enigma chi kittyek tari gani ashi ahet ki jyanche shabd 'classs' ahet. do search for enigma songs' lyrics someday. You will like it.
Delete