Friday, June 22, 2012

ड्रायव्हिंग चा ट्रान्स

गाडीचं दार उघडून गाडीत बसलो. ऑफिसची बॅग बाजूच्या सीट वर ठेवली. सीटबेल्ट लावला. गाडीला स्टार्टर दिला. स्टिरिओ वर मेटॅलिका चं - टर्न द पेज गाणं लावलं, व्हॉल्यूम जरा चढच ठेवला. सीट थोडी मागे कलती केली. मागे रेलून बसलो. डोकं हेडरेस्ट ला टेकून ठेवलेलं, डावा हात गियर वर, उजवा स्टिअरिंगच्या वरच्या भागाला धरून. आरसा सेट केला. गाडी सोसायटीमधून बाहेर काढली आणि काही अंतराने हायवे ला लागलो. स्पीड घेता घेताच काच खाली केली आणि हायवेच्या राईट लेन मधे स्थिरावलो.

सकाळच्या वेळी असते तशी हायवेला गाड्यांची किंचित गर्दी होती. पण मला तो रोड एखाद्या लांबलचक मोकळ्या रोड सारखा भासत होता. ७० च्या स्पीड ला गाडी लावून धरली होती. राईट लेन अजिबात सोडत नव्हतो. मागच्या पुढच्या बाजूच्या सगळ्या गाड्या अदृश्य भासत होत्या. असं वाटत होतं की अशा एखाद्या सुंदर मोकळ्या रोड वर मी एका स्थिर गतीने, खुल्या काचेतून आत शिरणारा वारा खात, शान मधे गाडी चालवतोय, आणि ड्रायव्हिंग नावाचा एक स्वर्गतुल्य अनुभव घेतोय.

स्टिरिओ वरच्या गाण्यांमुळे मी ऑलरेडी ट्रान्स मधे गेलेलो होतो. अ‍ॅम्प्लिफायर च्या ताकदीने दणाणणारा प्रत्येक बीट, माझी ही झिंग वाढवत होता. त्यामुळे आजूबाजूच्या बिल्डिंग्स च्या जागी मला डोंगर, समुद्र दिसत होते. सिग्नल म्हणजे व्ह्यू पॉईंट्स वाटत होते. माझी गाडी मला एखादी क्न्व्हर्टिबल गाडी भासत होती. रस्त्यातले काटकोनी ‘टर्न’ मला समुद्रालगतच्या रोडच्या लांबलचक आणि खिळवून ठेवणा-या वळणांसारखे वाटत होते...

अशी वळणं घेत गाडी एका जागी येऊन थांबली. का...  ते मी हळू हळू समजत होतो. ट्रान्स मधून बाहेर येत होतो. ऑफिस आलं होतं. कामाला जायचं होतं. काही मिनिटं तसाच गाडीत बसून राहिलो... आणि मग सावकाश गाडीतून उतरून ऑफिसकडे चालू लागलो. तरी चार पावलानंतर पट्ट्कन मागे वळून गाडीला एक डोळा मारल्यावाचून राहवलं नाही.

हे पहिल्यांदा होत नव्हतं. जेंव्हा जेंव्हा मी आमची गाडी चालवतो, तेंव्हा तेंव्हा कमी अधिक प्रमाणात हे असंच होतं. Because I am in my OWN world when I am driving.


8 comments:

  1. Fantastic ! Ferari ki sawari ! !

    I never thought Driving ka bhi itna nash hota hai.

    Keep driving ur imaginations It wii pull yourself out.
    I enjoyed it.

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad Kaka; Really appreciate this comment.

      Delete
  2. living every moment....thats cooll.......swarga ithech aahe ...ithech aahe...ithech aahe.....

    ReplyDelete
  3. Can't wait for my first drive, Will do it soon

    ReplyDelete
  4. Jasa experience kartos tasach lihilays.. have liked it and have seen it as well :)

    ReplyDelete