Wednesday, June 6, 2012

बाकी शून्य




केलेली किंवा ऐकलेली फोनवरची संभाषणं आठवा; किंवा प्रत्यक्ष झालेली बातचीत आठवा. त्यात वारंवार वापरलेले वाक्प्रचार किंवा शब्दप्रयोग आठवा. हाय, हॅलो, काय म्हणता, बाय या सगळ्यांपेक्षाही अधिक वेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘बाकी’.

एक विषय आणि दुसरा विषय यांच्यातला दुवा म्हणजे ‘आणि बाकी?’. चार वाक्य झाल्यावर सवयीप्रमाणे टाकलेला एक प्रश्न म्हणजे, ‘बाकी?’. कुणी फार कंटाळवाणं बोलत असेल तर त्याला ब्रेक लावणारा प्रश्न म्हणजे ‘मग बाकी?’ काहीजणांसाठी तर फोन केल्यापासूनच एखाद्या मंत्राप्रमाणे जपायचा शब्द म्हणजे ‘बाकी?’

खरं सांगावं तर मला असं कुणी विचारलं की मला बाकी काहीच सुचत नाही. म्हणजे, ‘काय बोलणार?’ असं होतं. म्हणजे कंटाळाच येतो म्हणा ना. मग मजेत का होईना, म्हणावंसं वाटतं, ‘बाकी शून्य !’

No comments:

Post a Comment