Sunday, December 16, 2012

चिनी अतिक्रमण

सहज म्हणून मी अंघोळीच्या पंचाचं लेबल निरखून बघत होतो तेंव्हा त्याचं एक धक्कादायक वैशिष्ट्य नजरेस पडलं; की तो चिनी बनावटीचा आहे !!! चिनी अतिक्रमण कुठवर येऊन पोचलंय याची जाणीव झाली मला.


गमतीचा भाग सोडला, तर ही वस्तुस्थिती खरं तर किती चिंताजनक आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या कात्रीपासून ते अंगावरच्या कपड्यांपर्यंत, मोबाईलपासून ते टीव्हीपर्यंत...८०% गोष्टी आपण चिनी बनावटीच्या वापरतो.

तिकडे अरुणाचल प्रदेश ला ती लोकं आपला भाग म्हणून नकाशात दाखवतात. तिथे रहाणा-या भारतीय लोकांना अमेरिका इ-व्हिसा देते, म्हणजे पासपोर्ट वर स्टॅंप मारत नाही.. का? तर तो मारला तर अरुणाचल भारताचा भाग आहे हे मान्य केलं असं होईल. उघड उघड भारताची आणि भारतीयांची गळचेपी ती चिनी लोकं करतायत, आणि तरीही आपण आपलं त्यांची उत्पादनं भरभरून विकत घेतोय, वापरतोय.

हे थांबायला हवं असं कुठेतरी वाटतं. मला किंवा आणि कुणाला वाटून काही होत नाही म्हणा. हे आपल्या सगळ्यांना जर वाटलं तरच काहीतरी होऊ शकेल. अर्थात; आपल्याला फरक पडत असेल तर. फरक पडत नसेल तर मग; काय फरक पडतोय !

No comments:

Post a Comment