‘क्या बात! क्या बात! क्या बात!’
‘चुम्मेश्वरी पर्फॉर्मन्स’
‘नाउ दॅट्स व्हॉट आय कॉल अ पर्फॉर्मन्स’
‘स्टुपेंडोफॅंटाब्युलसली फॅंटॅस्टिक पर्फॉर्मन्स’ (हे काय आहे चायला मला आजवर कळलं नाही)
आणि काय ते...
‘सँटाबाबाडा पर्फॉर्मन्स’ (मला लिहितानाही चीड येतेय. पण असो.)
‘परफेक्ट पर्फॉर्मन्स’ (नेने बाईंनी डिसेन्सी ठेवली)
डान्स शोंचं जे काय खूळ बोकाळलंय, त्या शो मधल्या विविध जजेस चे हे काही सिग्नेचर वाक्प्रचार. एखादा नाच आवडला की ते जज हे असं काहितरी म्हणतात आपापलं ठर(व)लेलं. आणि मग त्यांनी तसं म्हटलं की स्पर्धक एकदम देवाने कौल वगरे दिल्यासारखे खूश होतात. आणि मग अमूक अमूक जी से ‘क्या बात’ मिला ! वा वा वा वा ! असं अॅंकर कडून वाक्य येतं. स्पर्धक पुन्हा खूश. म्हणजे आधी ऐकलं नसावं अशाप्रकारे. मग जोडीदार स्पर्धकाला मिठी वगैरे मारायची पद्धत असते. त्याशिवाय तुम्ही खूश आहात हे लोकांना कळत नाही. काहीवेळा स्पर्धक जागच्या जागी ४ उड्या मारत ‘वू......’ असा एक कोल्हेकुई किंवा कुत्रेकुई सारखा आवाज काढतात.
हे असं प्रत्येक डान्स शो मधे होतं. मी सहज कल्पना केली की एखादा उलट्या डोक्याचा जज तिथे गेलाच तर, तो काय करेल. म्हणजे.... तो त्याला एखादा नाच आवडला की म्हणेल; ‘कचरा पर्फॉर्मन्स’ किंवा ‘गटार पर्फॉर्मन्स’ (इन अॅप्रिसिएशन बरं का). मग स्पर्धक ‘वू......’ अमूक अमूक जी से ‘गटार’ मिला.... वाव ! माइंड ब्लोइंग (हे पण एक नेहमी म्हणायचं असतं) !
पेपरात जे भविष्य येतं, त्यात कसं सगळ्या राशींना ४ चांगली वाक्य १ थोडंस चिंतेच किंवा सूचनेचं वाक्य असं साधारण मिश्रण करून प्रत्येक राशीचं भविष्य लिहिलेलं असतं. तसं या डान्स शो मधल्या कमेंट्स चं असतं. एक जज म्हणतो ‘आउट स्टॅंडिंग’ पर्फॉर्मन्स. सिर्फ आपको अपने एनर्जी पर और मेहनत करनी पडेगी. (म्हणजे काय?) दुसरा जज उलटं म्हणतो. तो आधी म्हणतो की मुझे आपका आज का पर्फॉर्मन्स इतना अच्छा नही लगा. (की स्क्रीन लगेच ब्लॅक अॅंड व्हाईट होतो). दोन वेळा ढॅं! ढॅं! असा आवाज येतो. पुन्हा सुरू. मग त्या स्पर्धकांचे चेहरे चिंताग्रस्त झालेले असतात. तो जज पुढचं वाक्य म्हणतो. लेकिन अमूक अमूक, जिस तरह से स्टार्ट टू एन्ड आपने जोश बरकरार रखा, मैं उसकी दाद दूंगा. (टाळ्या !)
हे असं चित्रविचित्र, चांगलं वाईट, खोटं खोटं, सगळं एक तास करायचं की टी आर पी चा पूर ! ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह्ड

No comments:
Post a Comment