Friday, August 17, 2012

डायट अ‍ॅंड बॅडमिंटन

काही दिवसांपूर्वी ऑफिसमधल्या कॅंटीन मधे टीव्ही वर सायना नेहवाल ची मॅच सगळे उत्साहात बघत होते. दुपारी दोनची वेळ होती, आणि एक माणूस आमच्या बाजूला बसून जेवत होता, जेवता जेवता टीव्ही बघत होता. चिकनच्या ग्रेव्हीत कालवलेल्या भाताचा शेवटचा घास घेत, आपल्या नगारासदृश पोटावरून दुसरा हात फिरवत मला म्हणाला असं, "बॅडमिंटन इज नॉट सुटेबल फॉर अवर डायट यु नो"

साल्या, म्हटलं, "अवर डायट इज नॉट सुटेबल फॉर बॅडमिंटन. अ‍ॅण्ड, टॉक अबाउट यू; आय कॅन प्ले बॅडमिंटन. इन फॅक्ट आय हॅव प्लेड अ‍ॅट द स्टेट लेव्हल इंटरस्कूल कॉम्पिटिशन." (तसं म्हणायचं झालं तर या माणसाला कुठलाच खेळ ‘सुटेबल’ होणार नाही असा होता तो)

काय महाभाग असतात ना ! म्हणजे त्याने ज्या सहजतेने परिस्थिती ‘फ्लिप’ केलीन, चायला ! मला हसू का चिडू झालेलं.

No comments:

Post a Comment