Thursday, July 26, 2012

हप्ता बंद


हप्ता बंद नावाचा कार्यक्रम बघत होतो. एक कुटुंब आलं होतं. त्यांची ’इन्ट्रो’ म्हणून एक दृकश्राव्य क्लिप दाखवण्यात आली. त्यात त्यांनी कसं कर्ज घेतलं, मग ते फेडण्यासाठी त्यांच्याकडे कसे पैसे नव्हते, मग त्यांनी कसा आत्महत्येचा प्रयत्न केला,... असं सगळं ..त्यांच्याच कडून अ‍ॅक्ट करून घेतलं होतं... (म्हणजे ती व्यक्ती असे पेपर बघून खोटं खोटं चिडतेय... मग बायकोची ओढणी घेऊन पंख्याला बांधतेय वगैरे वगैरे). तसं ख्ररं घडलं असेल, पण ते त्यांनीच पुन्हा अभिनय करून दाखवणं फार फनी वाटलं. आणि मग ती क्लिप झाल्यावर कार्यक्रमाचे सूत्रधार, प्रेक्षक आणि स्पर्धक.. सगळ्यांनी चेह-यावर स्मित ठेवून ’टाळ्या’ वाजवल्या.

अरे काय चाल्लंय ! मूर्खपणाचा कळस आहे.

गोष्टींच्या अशा RIDICULOUS COMMERCIALIZATION आणि DRAMATIZATION ला आपण थंड पणे बघतोय, स्वीकारतोय, प्रतिसाद देतोय, त्यांचा टीआरपी वाढवतोय. मेरा भारत महान बाबा.

2 comments:

  1. अगदी बरोबर. मलापण प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या खटकल्या. फ़क्त ह्या एकाच नाही तर सर्वच मराठी वाहिन्यांवर कल्पनांचा आणि संवेदनशीलतेचा दुष्काळ चाललेला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी काहीही दाखवण्याची ही घाणेरडी वृत्ती मराठी प्रेक्षक सहन करणार नाहीत याची खात्री आहे.
    Visit my similar thoughts on
    http://railandbusfanning-ram.blogspot.in/2012/07/blog-post_13.html

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Ram for your comment. I hope it happens, but I believe it will not.

      Delete