Wednesday, July 4, 2012

नडला की तोडला - पार्ट २

‘नडला की तोडला’... नावाची एक पोस्ट केली होती मी माझ्या एका दुस-या ब्लॉग वर. http://ajstates.blogspot.in/2011/05/blog-post_11.html

तसाच एक काहीसा किस्सा परवा झाला. आम्ही गाडीतून जात होतो, आणि समोरच्या गाडीच्या मागच्या बंपर वरच्या स्टिकर ने माझं लक्ष वेधून घेतलं. आणखी एक स्टिकर ‘क्लिक’ झाला मला ‘क्लिक’. :) स्टिकर असा होता...



EPIC आहे. ऐतिहासिक. खतरनाक. म्हणजे टॉपच. भरीस भर म्हणजे हे पुण्यात नजरेस आलेलं वाक्य आहे. इथेच त्याची महती सिद्ध होते खरं तर..

पण ज्याला सुचलं तो माणूस सॉलिड क्रिएटिव्ह असणार. म्हणजे उगाचच मोठमोठी वाक्य लिहिणा-यांपेक्षा मला या माणसाची प्रतिभा जास्त भारी वाटतेय. सिंपल आणि स्पष्ट. चिटका... तो फटका. खलास!

2 comments:

  1. गाडीवर त्यापेक्षा द्वयअर्थी म्हणजे चांगल्या अर्थाने घोषवाक्य लावावे
    जरासी सावधानी , जिंदगी भर आसनी
    म्हणजे कार्यभाग तर साधल्या जाईल व कुटुंब नियोजनाच्या सरकारी घोषणेचा प्रसार

    ReplyDelete