पंकज, "गुड ईविनिंग, मे आय स्पीक विथ मिस्टर अजय?
"हं"
(पंकज आता स्मार्ट झाला. मी मधेच कट करू नये म्हणून तो नुसती वाक्य बोलत न सुटता, प्रश्न करू लागला. U know, to invite the listener into the conversation...)
"हाउ आर यू मिस्टर अजय?"
(की अजय ला गुड/ठीक/बॅड काहीतरी म्हणणं भागच झालं)
"गुड"
"मिस्टर अजय आय अॅम कॉलिंग फ्रॉम स्फोटक बॅंक. डू यू ओन अ हाउस सर?"
"नो"
"दॅट्स गुड. (?????) अवर बॅंक इज ऑफरिंग हाउसिंग लोन अॅट अॅट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स"
(मधेच तोडून) "नॉट इंटरेस्टेड." कट
मग असंही डोईजड व्हायला गेलं. आदिमानवापासून आत्तापर्यंत जशी माणसाची उत्क्रांती होत गेली तशी या संभाषणाची उत्क्रांती होत गेली. त्याची लांबी कमी होत गेली. आणि मग आणखी पुढचा बदल.
पंकज, "हॅलो?
"हॅलो"
"अॅम आय स्पीकिंग विथ मिस्टर अजय?"
"या"
"व्हेरी गुड मॉर्निंग सर माय नेम इज पंकज"
कट
पंकज, "हॅलो"
"हॅलो"
"क्या मैं अजय जी से..."
कट
(म्हणजे काय की बाबा तुला बोलायचा त्रास नको आणि मला ऐकायचा नको. किंवा उलटं. :P)
समस्त टेलिकॉलर्स लोकांनो, फोन करून मार्केटिंग करणं आणि या अजय सारख्या लोकांना उलट उत्तर न देता सतत कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणं, हा तुमचा जॉब तुम्ही चोख बजावता. आणि ही गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे. पण काय आहे की कितीही उडवलं तरी पुन्हा कानाशी येऊन घूं.... घूं..... करणा-या माशीची जी गत होते तीच तुमची होते; त्याला आम्ही काय करणार?
तुम्हालाही असे पंकज, अशा शिल्पा भेटत असतील. त्यांना टाळायच्या तुम्हीही अनेक कल्पक युक्त्या वापरत असाल. त्या नक्की शेअर करा; वाचायला आवडेल !
-----XXX------
No comments:
Post a Comment