Saturday, December 29, 2012

You are a REAL Indian if

You are a real Indian if;
You do not believe in Rules, Regulations or Laws
You think that garbage can be thrown anywhere
You have in some point of time dreamt about 'Foreign'
You start honking if the car in front of you does not move for even a second
You start honking even if the car in front of you is moving fine
You swear if a pedestrian crosses the road in front of you
You think that when you own a car, you own the roads too
You are a real Indian if;
You believe that there is WORLD under the table
You can work like a slave for your employer to be in his good books
You think that you have all the knowledge and the person talking to you is dumb
You cannot help peeping into a roadside fight and motivate the fighters
You can say `अपनेको क्या है!’ even if a fire breaks out at your neighbor's house
You are not affected by news of someone being robbed, killed, or raped
You feel that regular blasts and disasters are good for a city's integrity and morale
You don't respect your country
You consider mobiles to be status symbols
You don't Protect; You Protest
You can party no matter what happens around you or in your country
You are a real Indian if;
You realize Nothing after reading this
You think this post is crap and you continue to be yourself.

हॅप्पी न्यू इयर

दिल्लीतील सामुहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या मुलीचा आज सकाळी मृत्यू झाला. । मुंबईत ३१स्ट निमित्त रात्री एक वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी तसेच सकाळी पाच वाजेपर्यंत पार्ट्यांना परवानगी. । शहरात ठिकठिकाणी होणार नववर्षानिमित्त जल्लोष, मॉल्स, आणि हॉटेलांना तरूणाईची पसंती. ।

या बातम्या आहेत. यातली विसंगती आणि त्यातून पुढे येणारी भावनाशून्यता फार जणांना समजेल असं नाही. माझा एक मित्र म्हणाला आज ही बातमी ऐकल्यापासून ३१स्ट ‘सेलिब्रेट’ करावा असं वाटतच नाहीये. मी म्हटलं अरे हे तुला वाटतंय, पण ते तुझ्यापर्यंतच राहील. कारण कोट्यावधींना असं मुळीच वाटत नाहीये. त्यांच्या पार्ट्या होणार. नाचगाणी होणार. ३१स्ट आहे ना बाबा. तो मेन आहे. कसंही सुरू झालं असलं तरी ‘हॅप्पी न्यू इयर’ आहे.

Friday, December 28, 2012

जगाचा अंत


दिवस उजाडता भीती आहे, रात्र होता धास्ती आहे
उद्याचा दिवस चांगला असेल याची कुणाला खात्री आहे?
आता लोकांकडे पैसा आला आहे, चांगल्या आणि वाईट मार्गांनी
पैशाबरोबर माज आला आहे, अहंकार आला आहे, उद्दामपणा आला आहे
शिरजोरी करायची, स्वैराचार करायचा हीच वृत्ती झाली आहे
आपुलकी, प्रेम, सामंजस्य, सद्विचार, संस्कृती हे खोटे शब्द झालेत
मिळतं त्यात कुणीच संतुष्ट नाही, काही मिळवण्यासाठी कष्ट नाही
सगळं आयतं हवं आहे; हवंच आहे; आणि ते नाही मिळालं तर...
ते नाही मिळालं तर माणसं कुठल्याही थराला जाऊ लागली आहेत
खून, मारामा-या, चो-या, बलात्कार...
रोज; दररोज या अशाच बातम्या बघाव्या लागत आहेत, ऐकाव्या लागत आहेत
हटवाद, छळवाद, चंगळवाद, आणि वासनेचा समाजाला ज्वर झालाय
भौतिक प्रगती झाली असेल पण नैतिक अधोगतीचा कहर झालाय
नात्यांची तर गोष्टच वेगळी; ती काय असतात हेच कुणाला ठाऊक नाही
पैशाने माणसं जोडावी, पैशासाठी तोडावी; माणसांचं कुणाला कौतुक नाही
सगळा समाज आत्मकेंद्री झालाय, स्वार्थी झालाय, हैवान झालाय
निसर्गही त्याला अपवाद नाही; तोही आता सैतान झालाय
भूकंप होत आहेत, पूर येत आहेत, प्रकोप होतो आहे

कसलीच; कुणाचीच; शाश्वती नाहीये
सगळं अनाकलनीय झालंय, असंबद्ध झालंय, अतर्क्य झालंय

‘हा’ जगाचा अंत नाही तर आणखी काय आहे?

Wednesday, December 26, 2012

Parallel Parking

Out of the millions of people who drive cars, only a few thousands know how to 'park' a car correctly. A few people in my locality don't even know there is something called as 'parking'. They just drive in and stop wherever they feel, leave the car like that and that's all.

Parallel Parking. An essential skill that the car owners/drivers should have. It is very rare to find though. More so because many of the people perceive it as a very hard thing to do. But it is really simple to be frank. It just needs a little judgement, and a little calculation.

I am not an expert driver, but I thought I should share my understanding and knowledge about this Parallel Parking act, so that those who are unnecessarily scared of it, become confident about it.










I hope this helps the readers to park their cars perfectly, and effortlessly.

Drive Safe!

Sunday, December 16, 2012

चिनी अतिक्रमण

सहज म्हणून मी अंघोळीच्या पंचाचं लेबल निरखून बघत होतो तेंव्हा त्याचं एक धक्कादायक वैशिष्ट्य नजरेस पडलं; की तो चिनी बनावटीचा आहे !!! चिनी अतिक्रमण कुठवर येऊन पोचलंय याची जाणीव झाली मला.


गमतीचा भाग सोडला, तर ही वस्तुस्थिती खरं तर किती चिंताजनक आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या कात्रीपासून ते अंगावरच्या कपड्यांपर्यंत, मोबाईलपासून ते टीव्हीपर्यंत...८०% गोष्टी आपण चिनी बनावटीच्या वापरतो.

तिकडे अरुणाचल प्रदेश ला ती लोकं आपला भाग म्हणून नकाशात दाखवतात. तिथे रहाणा-या भारतीय लोकांना अमेरिका इ-व्हिसा देते, म्हणजे पासपोर्ट वर स्टॅंप मारत नाही.. का? तर तो मारला तर अरुणाचल भारताचा भाग आहे हे मान्य केलं असं होईल. उघड उघड भारताची आणि भारतीयांची गळचेपी ती चिनी लोकं करतायत, आणि तरीही आपण आपलं त्यांची उत्पादनं भरभरून विकत घेतोय, वापरतोय.

हे थांबायला हवं असं कुठेतरी वाटतं. मला किंवा आणि कुणाला वाटून काही होत नाही म्हणा. हे आपल्या सगळ्यांना जर वाटलं तरच काहीतरी होऊ शकेल. अर्थात; आपल्याला फरक पडत असेल तर. फरक पडत नसेल तर मग; काय फरक पडतोय !