Monday, August 22, 2011

थरांचा थरार

दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून जन्मलेला खेळ. त्याचा आता ‘स्पोर्ट’ झालाय ‘स्पोर्ट’. त्यात संस्कृती किती उरलीय हा वादाचा मुद्दा झाला, पण त्याचं स्वरूप फार (जरा जास्तच) मोठं झालंय. बक्षिसांच्या रकमांमधे शून्यावर शून्य चढवली जातायत. (गोविंदांच्या हातातही बहुदा शून्यच येत असावीत.) वर्गणी चं स्वरूप वर्गणी सारखं कमी आणि खंडणी सारखं अधिक वाटायला लागलंय. स्पॉन्सर्स चे बॅनर आणि डीजेंचे स्पीकर दोन्ही वर्षागणिक मोठे होतायत. यातले गोविंदा मात्र मनो-यासरशी वर जातात आणि मनो-यागत खाली येतात.


या प्रकारात त्यांना कुठला आनंद मिळतो ते मला ठाऊक नाही पण ते जीव धोक्यात घालतात एवढं दिसतं. ८ थर.... ९ थर..... १० थर.....; थरांची संख्या वाढत जाते. आयोजक याला ’थरार’ असं म्हणतात. बघणा-यांचा हे बघूनच थरकाप होतो. आणि प्रत्यक्ष गोविंदा मात्र थरा थराला थरथरतात.


एकूणच सगळं कुठल्या थराला नेलंय... काय रे बाबा!

5 comments:

  1. You are absolutely right...
    Politicians are purposely rasing gift amount for their own publicity...
    This has to be stopped... Better we should give publicity and increase our participation to chilren's 'handi' with one or tow levels only to support our traditions.

    ReplyDelete
  2. True post. Tujhya shanka raasta aahest aani tya aaplya saglyanchyach shanka astat. Ugach utsahavar wirjan nako mhanun saglech shanta bastat. Well expressed!

    ReplyDelete
  3. दही हंडी
    दूर उंचावरी दिसतसे हंडी हो सत्तेची|
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची||

    जमतील पोरे इथे खेळण्या, खेळ गोविंदाचा,
    रचतील उंच मनोरे घेतील वेध दहीहंडीचा,
    मनात आठव सतत राहू दे 'मत' वाल्या दिवसाची|
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची|| १||

    ढोस देऊनी परिसरातुन धन अमाप जमवा
    ठोस बक्षिसे देऊनी अमुचे चित्रफलक लावा
    पदरमोड ना करता होईल चर्चा उदारतेची|
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची|| २ ||

    उंच बांधा हंडी आणि दही त्यात ठेवा
    परंतु लोणी काढून अपुल्या श्रेष्ठींना लावा
    पडला झडाला कुणी गोविंदा परवा ना त्याची|
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची|| ३ ||

    देऊन पैसे अप्सरांना मंचावर नाचवा
    ओंगळ दर्शन नट-नट्यांचे जनतेला घडवा
    हीच वेळ रे प्रतीमेवरचे काळे डाग धुण्याची
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची|| ४ ||

    दही दुध चोरून देव झाला कान्हा गोकुळीचा
    सत्ता मिळता दारी अमुच्या रतीब मलईचा
    करा तयारी कृष्णकृतीने निवडून येण्याची
    सोडू नका रे ही तर आहे संधी सोन्याची|| ५ ||
    प्रदीप ओक

    ReplyDelete
  4. नुसता गोविंदांचा थरथरत नाही तर सर्व स्थानिक मंडळ जास्त थरथरतात ! चांगले गोविंदा कसे मिळावे..आणि मग त्यांच्या नवा खाली बाजार कसा मांडावा ! सेलिब्रेटी कसे येतील त्यातून आपला धंदा कसा होईल , ह्या सर्व गोष्टी नि थरार वाढतो ...लटकतो बिचारा गोविंदा !!

    ReplyDelete
  5. Thx Paresh, Thx Arnika,

    Pradeep Oke: Kavita uttam ahe tumchi ! Dhanyawaad.

    Thanks Anup.

    ReplyDelete