Monday, August 15, 2011

रिक्शा...


आता रिक्शा मिळणं हे लॉटरी लागण्याइतकं ’रेअर’ झालेलं आहे. मुंबई, पुणे, आणि माझ्या माहिती प्रमाणे जवळपास सगळीकडेच ही गत आहे.


  • रिक्शा रिकामी नाही असं आता फ़ारसं होत नाही. किंबहुना तो मुख्य प्रॉब्लेम नव्हे. कारण रिक्शा जास्त करून रिकाम्याच बघायला मिळतात.
  • पूर्वी रिक्शावाला विचारायचा, ’कहां जाओगे?’; आता प्रवासी विचारतात, ’कहां जाओगे?’
  • एखादा रिक्शावाला थांबलाच, आणि प्रवाशाने एखादं जवळचं ठिकाण सांगितलं की त्या प्रवाशाकडे अतिशय तुच्छतापूर्ण नजरेने बघून रिक्शावाला निघून जातो.
  • म्हाता-या माणसांनाही हे मुजोर रिक्शावाले तितक्याच उद्धट्पणे नाकारतात. विसरत असावेत की एक दिवस तेही म्हातारे होतील, त्यांनाही कदाचित चालणं कठीण होईल आणि मग तेंव्हा त्यानाही रिक्शा किंवा कुठल्यातरी वाहनाची गरज लागेल.. जाउदे; ज्याचे त्याला. 
  • काही रिक्शास्टॅंड वर रिक्शावाले भाजीवाल्यांप्रमाणे ओरडत असतात. ’चला वाघबील वाघबील वाघबील....’; ’चला काशीमिरा काशीमिरा, काशीमिरा...’ असं.
  • पोलिस वगैरे यांना काही करत नाहीत. तक्रारींचे फ़ोन काढून ठेवलेले असतात आणि पर्सनली गेलं तर कुणाला फ़ारसा वेळ नसतो. त्यामुळे रिक्शावाल्याना कधी ’पोलिसांकडे जाईन’ सांगून धमकी देण्याचा प्रयत्न केला, किंवा नंबर वगैरे नोंद करून घेतला तरी त्याना फ़िकीर नसते कारण, शिक्षा होण्याची भिती नसते. अर्थात, कदाचित काही ठिकाणी पोलिस दखल घेऊन शासन करतही असतील, नाही असं नाही. पण बहुतांश ठिकाणी ते काही करत नाहीत. काही राजकीय पक्षांनी याबाबत पावलं उचलली आहेत आणि तेच पक्ष कदाचित यांना दम देऊन सरळ करू शकतील असं कुठेतरी वाटतं. पण ही गोष्टही रिक्शा मिळण्याइतकीच ’रेअर’.


तर असा प्रॉब्लेम आहे ना? प्रवाशांना ज्या त्या ठिकाणी जायचंय. रिक्शावाल्यांना त्यांना हव्या त्याच ठिकाणी जायचंय. माझ्या मते यावर साधा सरळ उपाय होऊ शकतो. बस वर कशा पाट्या असतात गंतव्य स्थानाच्या, तशा रिक्षांवर लावाव्यात. म्हणजे प्रश्नच मिटला.

(वरील फ़ोटो एडिट केलेला आहे)

No comments:

Post a Comment