काल पुन्हा एकदा रिक्षाने लॉंग ड्राइव्ह अनुभवायचा योग आला. रिक्षात बसताना
रिक्षा चालकाकडे एक आपली जस्ट नजर टाकली. चेहरा, स्टान्स वगैरे बघून अंदाज
येतो साधारण की ही 'राइड' कशी असणार आहे ते. तेंव्हा संतुलित वाटला माणूस.
अमूक ठिकाणी जाणार का? मी विचारलं. भविष्यवेत्त्याने भविष्य सांगण्याआधी
जसा विचार करावा तसा एक ५-६ सेकंद विचार करून मानेला एक होकारार्थी आणि
त्याचबरोबर आज्ञार्थी झटका देऊन तो रिक्षात बसला. त्या ५-६ सेकंदात काय गणित मांडलं त्याने कोण जाणे. मीही बसलो.
आपलं डावं बूड सीट च्या उजव्या भागावर स्थापून त्याने रिक्षाला किक मारलीन, खट्ट कन फर्स्ट गियर टाकला आणि झर्र्र्कन पिकप घेतला. व्हॉट अ स्टार्ट ! पहिल्याच डाव्या वळणावर मागून पुढे जाऊ पाहणा-या कार ला जे कोरणार केलंय त्याने ! तेंव्हाच कळलं, किक फक्त रिक्षाला बसली नव्हती !
सिग्नल आला. सिग्नल ला शेट थांबले. 'नशीब' असं म्हणतोय इतक्यात रिक्षा जवळ जवळ काटकोनात वळली, थेट राईट लेन ला आली, आणि बस आणि डिव्हायडर यांच्यातल्या खबदाडीतून डायरेक्ट पहिल्या पोझिशन ला येऊन उभी झाली. बसच्याही पुढे ! जस्ट वेटिंग फॉर द ग्रीन लाईट. मी सांगायला नको की ग्रीन लाईट लागल्यावर काय झालं. मग हायवे आला. आता खरी मजा!
बाकी सगळे गरीब रिक्षावाले डावीकडच्या दोन लेन मधून मूग गिळून चालले होते. त्या सगळ्यात आमची रिक्षा उजवी होती. आणि उजवीकडे होती. अख्खी रिक्षा एखाद्या मोबाईल प्रमाणे व्हायब्रेट होत होती, आणि उजव्या लेन मधून दणक्यात क्रूज करत होती. टर्बो-चार्ज्ड इंजिन असावं. समोर येणारे खड्डे त्या रिक्षावाल्याला बरोब्बर आणि स्पष्ट दिसत होते, प्रोजेक्टर हेडलाईट होते ना ! आणि ते दिसले कि तो सपकन एक छोटासा टर्न घेऊन ते चुकवत होता. अर्थात ! पॉवर स्टिअरिंग शिवाय हे शक्य आहे का? हे सगळं सुमारे सत्तर ऐंशी च्या स्पीडला. आमच्यापुढे असलेल्या गाडीला लाईट देणं चालूच होतं. साईड दिली असती तर ओव्हरटेकही केली असती म्हणा. न राहवून मी दोनदा म्हटलं त्याला की आरामात घे मित्रा घाई नाही आपल्याला. पण ते कसलं ऐकतंय ! सुसाटच चाललेलं पात्रं.
मग आमचं डेस्टिनेशन आलं. आलं म्हणजे, दृष्टीक्षेपात आलं. तोच ! तोच काय ! तोच पुढच्या बाईक वाल्याने ब्रेक मारला ! आणि की………क! असा आवाज करून आमची रिक्षा ५ एक फुटात थांबली. जागच्या जागी उभी. सरकली नाही की हलली नाही. इन द लाईन आणि ऑन द स्पॉट. माझ्या भीतीला समजावत मी म्हटलं, 'एबीएस आहे, त्यामुळे टेन्शन नाही.'

हम्म रिक्षावाले तळहातावर शीर घेऊनच रिक्षा हाकत असतात,नाही?
ReplyDeleteएक काळ होता कॉलेजमधून घरी जाताना मी आणि माझी एक मैत्रीण रिक्षा आतून कशी दिसतेय? नवीन सीट्स, डेक इ. इ. attributes चेक करून मगच बसायचो. नाहीतर उगीच थांबलेल्या रिक्षाला चक्क आम्हाला कुठेच जायचं नाही म्हणून सोडून द्यायचो :)
ho na.
Deleteho amhihi gaadiwali gaaniwali CH riksha pakdaycho. anyatha nahi. :P dhamal yaychi.