Thursday, September 15, 2011

TRAI ने केला BHEJA FRY

‘..........this is a magical picture of God. Send this to as many people as you can and see a Miracle in 1 hour.’ असे मेसेज आता निरर्थक होतील, कारण TRAI ने आता मोबाईल धारकांच्या एस एम एस पाठवण्याला लगाम घातलाय.

मला या मागचा विचारच कळला नाही. हा निर्णय निव्वळ मूर्खपणाचा आहे. एक तर असं करून बल्क एस एम एस ला आळा बसेल असं मला वाटत नाही. कारण त्यासाठी मुळात स्पॅम फ़िल्टर सदृश यंत्रणा आणखी सक्षम हवी. त्या बाबतीत तर आनंद आहे. आणि दुसरं म्हणजे हा सरळ सरळ व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, मोबाईल धारकांच्या. रेग्युलेटरी ऑथॉरिटी झाली म्हणजे काय शाळेच्या शिक्षकासारखं बघाल की काय सभोवताली? मला आठवतंय, शाळेत असताना २-४ जणांनी मस्ती केली की त्याची शिक्षा कधी कधी अख्ख्या वर्गाला मिळायची. तसंच झालं हे. बरं ज्याला मस्ती करायचीय तो तरीही मस्ती करतोच.


तसंच, मोबाईल कंपन्यांनाही यामुळे तोटा होईल हे निश्चित आहे. मधे मी ऐकलेलं की म्हणे मुंबईत गाडीत गाणी लावण्यावर निर्बंध येणार आहेत. या लोकांची डोकी बहुदा ठिकाणावर नाहीत. आणि असंच जर का तुम्हाला करायचं असेल तर मग आधीच अंधारात असलेल्या या देशाच्या भविष्यातला अंधार अजून दाटल्याखेरीज रहाणार नाही.

मोबाईल कॉल्स वर पण निर्बंध लागतील पुढे. दिवसाला ५ च फोन. दिवसाला १०च मिनिटं फोन. मी तर म्हणतो मग बिलाची सिस्टीम ठेवावी कशाला? असं करा की माणसाच्या वयानुसार / वर्गानुसार / उत्पन्नानुसार त्याचा परमिटेड मोबाईल वापर ठरवा. रेशन करा त्याचं. आनंद आहे.