Monday, March 1, 2010

पुंडलिक वरदे हरी विट्ठल !


काही दिवसांपूर्वी मी नागाव इथे एकनाथ महाराजांच्या पालखी सोह्ल्यासाठी गेलो होतो। त्या पदयात्रेचे हे २५ वे वर्ष असल्याने उत्साह जोरदार होता। कीर्तन आणि भोजन असा साधा सोपा आराखडा होता। भोजनानंतर पदयात्री पुढच्या मार्गाक्रमनास सुरुवात करणार होते.

कीर्तन हा प्रकार आता फारसा ऐकायला मिळत नाही। किंबहुना आजकाल मंडळी त्या दिशेला फिरकत नाहित। देवाला शोधण्याचे, मन:शान्ति शोधण्याचे मार्ग बदललेत कदाचित। तर, अस हे कीर्तन ऐकण्याची माझीही पहिलीच वेळ होती। बुवांनी विट्ठल नामाच्या गजराने किर्तानास सुरुवात केली मात्र आणि बघता बघता जमलेली मंडळी तल्लीन होऊ लागली। माझा आणि अध्यात्माचा तसा काहीच संबंध नाही पण तत्वद्न्यान मला नेहमीच आवडतं। आणि बुवांच्या सांगण्यात सुधा मी नेमक तेच शोधलं आणि मला ते भावलं। गोष्टी, भजनं, ऐकत ऐकत कीर्तन कधी संपलं समजलच नाही। जेवून आम्ही परतीस निघालो। त्या किर्तानाचाच प्रभाव असेल की ज्यामुले मला काहीतरी सुचलं जे मी पुढे लिहिलंय।

कीर्तनकार बुवांनी जे सांगितलं ते तर फ़क्त त्यांनीच सांगावं असं होतं। त्यामुले ते 'लिहायचा' प्रयत्न न करता आचरणात आणायचा मी प्रयत्न करतोय।












नेट असे घरोघर
नेट नेई जगभर
नेट द्न्यानाचा सागर
अपूर्व म्हणे

असो कुठलीही वेळ
आम्ही बघावी इमेल
एका क्लिकाचा हा खेळ
अपूर्व म्हणे

कुणा फार्मविले चे भान
कुणा काफे ची हो भूक
सर्वा हवे फेसबुक
अपूर्व म्हणे

जरी बंधने अतूट
तरी होई ताटातूट
होई दुवा ऑरकुट
अपूर्व म्हणे

असेही असेल याहू
आम्ही स्क्रीन पाशी राहू
आणि विठ्ठलाला पाहू
अपूर्व म्हणे

असा प्रश्न एक नाही
ज्याची न मिळे उकल
धन्य धन्य ते गूगल
अपूर्व म्हणे

द्न्यान संतांचे अजोड
रोज रोज थोडं थोडं
करू सारे डाउनलोड
अपूर्व म्हणे

जादू करील इंटरनेट
विश्वापलिकडे थेट
होइल भगवंताशी भेट
अपूर्व म्हणे

जय जय रघुवीर समर्थ !